थॅंक्सगिविंग पासुन ते नविन वर्ष सुरु होई पर्यंत खुप सारे वेगवेगळे सण आणि पार्टीज सुरु असतात त्याला 'Holiday Seaon' असं म्हणतात. सगळे आपली कामं संपवुन 'सेलिब्रेशन' मूड मधे असतात, basically रिलॅक्स अँड बी जॉली!
थॅंक्सगिविंग सुट्टीच्या दरम्यान बहुतांशी लोकं क्रिसमस ट्री लावून सजवतात. बरेच लोकं खरा क्रिसमस ट्री तोडून आणतात. आमच्या घरा शेजारी मोठा क्रिसमस ट्री फार्म आहे, अगदी बघण्यासारखा. तिथे ४० फूट उंचीचा सांता लावलाय आणि खरे रेनडीर आणतात, गरम गरम कूकीज, पोपकोर्न विकायला असतात. तिथे गेले कि मस्त festive वाटत. इथल्या कुटुंबांकरता क्रिसमस ट्री आणणे हा एक सोहळा आहे. जे खोटा ट्री लावतात त्याच्यासाठी पण सोहळाच असतो, जसं बसेमेन्ट मधून ट्री, ऑर्नामेंट्स, डेकोरेशन्स आणणे, लावणे आणि प्रत्येक ऑर्नामेंट सोबतच्या आठवणी. आमचे शेजारी त्यांच्या बागेतलाच क्रिसमस ट्री तोडतात, त्यांचा ट्री जवळपास १८ फुटाचा असतो. ह्या वर्षी मी माझ्या ऑफिस डेस्क वर पण क्रिसमस ट्री लावला.
ह्या दरम्यान येथील खुप लोकं समाजाला देतात . दुसऱ्याकडे काय नाही ते द्यायचा प्रयन्त करतात. आमच्या ऑफिसमध्ये 'Hart in the Holidays' प्रोग्रॅम द्वारा गरीब कुटुंबियांच्या 'wishes' पूर्ण केल्या जातात, आधीच्या ऑफिसमधे पण अश्याच प्रकारचा उपक्रम चालायचा, ह्यात भाग घेणे is a very 'feel good' factor during holidays.
![](https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjHZrTnXViIcV5OzPb6lm622EDt6Ce6Z9yIbeIFgWJw0llJDpu4deLme7-TE5mP5Do0Oj4rRpmuzpb75VxFbNBHGdFk-JovM0HvsCqYAnw61RkN1YO_LWjWA5HIeIw-FQpUc3nzXVYLmbLY/s320/IMG_9077.HEIC)
मागच्या वर्षी आणि ह्या वर्षी जयच्या कब स्काऊट तर्फे वृद्धाश्रमात जाऊन जयच्या स्काऊटने केलेली नाताळची कार्ड देतो आणि नंतर नाताळची गाणी त्यांच्यासाठी गातो, त्यांच्या चेहेऱ्यावरचा आनंदा अमूल्य असतो. ह्या वर्षी तर गाणीं म्हणुन झाल्यावर मुलांना मस्त सजवलेले कप केक मिळाले, जे त्या सर्व वृद्ध लोकांनी मिळून बनवले होते.
![](https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgZk475YUCkDdPbxdRL7ULr0oMrPbL5CJRvmDRwidCx9mYezqww5ZUMuxVpVwXSzKYAyJJ8hhPWkMX3iuGTWz6VGtBj-uM4YCyTsnAqzEXb9hEYVOGAwnSNzacKj34Yre9ie4m3viVH1laz/s200/IMG_9075.HEIC)
![](https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgmq1P8PFX4BMSiV58IwptVR2skXxL-pjNQevhGI66JJ4ejcrTec1wid6PznhLdAqVX_jaMnps-Cxq9ttbWK3lOswRE-WgVynX32XXNb2PSY3chiEi3SCsL36TvlbRojP5FHqDFI7xkWy8a/s320/IMG_9005.JPG)
इथे सगळ्या गोष्टी/कार्यक्रम चालतात ते 'voluenteering' (स्वयंसेवक) च्या बळावर. एक जण पुढाकार घेऊन कार्यक्रम बनवतो, वेगवेगळ्या कामांची यादी करतो आणि स्वयंसेवक एक एक काम करतात. Everything is self organized, no one bosses, just tries to do your best. जयच्या शाळेत 'Winter Workshop' हे त्याचा उत्तम उदाहरण आहे. इतक्या सुंदर मुलांसाठी activities and crafts की मुलं आनंद त्यांचे पालक एकदम खुश. ३ वर्षांपासून हा उपक्रम मस्त चालू आहे आणि दर वर्षी पुढच्या वर्षीच्या अजून अपेक्षा वाढवतो.
जयनी केलेलं सुंदर ऑर्नामेंट
जयच्या शाळेतली पार्टी मस्त झाली, जयने एक क्रिसमस ट्री चे ऑर्नामेंट बनवले.
![](https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEg3q3ZxQILZwUIwYrMpiXEUQPIzAltE9lhIfaquvKaY9FDEgtDoDjPS6Mq3Bz_rGAsknQex2dXpOGns7U9lY5bAvLlmciXNAzmTj9SHpwPtDgmLurEjA5t9qit-F-cwIvProB899uPmaazp/s320/IMG_9021.HEIC)
आमच्या ऑफिस पार्टीला मी आपला मसाले भात करून नेला, सगळ्यांनी आवडीने खाल्ला. जोडीला ऑर्नामेंट/कुकी डेकोरेशन स्पर्धा पण होती, मला बक्षीस मिळाले.
![](https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiJol8NgenKhLmTboT-QvDOOj3vPoiUu0QfDt9QSdngw73-n8xuOqssHoWM3dYrr0bYcShYZ_sOXSaa1-8pNW7bzma7Cumokr8DXCJVnJOs3sRRtVvjdD2Rb2nwAuGQqhmzW_h3r4C1sQXP/s320/IMG_1516.jpg)
ह्या सीजन दरम्यान खूप ठिकाणी लाईट शोज असतात, घराला खूप लाइटिंग करतात. काही काही घरं अगदी ह्या साठी प्रसिद्ध असतात, जिथे लोक बघण्यासाठी खूप गर्दी करतात.
न्यू यॉर्क पण खूप मस्त सजवतात. ह्या वर्षी आम्ही नवीन म्हणजे चिनी लाईट फेस्टिवल बघितला, प्रचंड सुंदर होता. एवढ्या थंडीत पण (जवळपास -५ ते -११ तापमान) लोक पाहायला गर्दी करतात.
वर्षाचा शेवट आम्ही ३ फॅमिली ६ दिवसांसाठी एकत्र राहून केला, असं वाटलं आपण एकत्र कुटुंबात राहत आहोत. सगळ्यांनी एकमेकांची खूप काळजी घेतली आणि एकमेकांच्या सहवासाचा आनंद घेतला आणि 'Tis the season to be jolly' म्हण खरी केली.
![](https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjMXm4VgFy_Jm9pdwnWgFz9wsJVV5LKCInv1Mi9go2FpVe3Np0fyV0CyOLTIZlpnaFsd9nGsCKciYZ86BzcIdNEGU_GW9brg0j1mLaQqq5V1GZRTDDIaGbywobbIWLrHqGBcGo-sjxlJicy/s320/IMG_1552.HEIC)
आमच्या ह्या वर्षीच्या भेटीची आठवण(G-B-S)
कॅमेऱ्यात बंदिस्त केलेले काही क्षण https://photos.app.goo.gl/a2M3Q3zXgeiLj5Vf8
मागच्या वर्षी आणि ह्या वर्षी जयच्या कब स्काऊट तर्फे वृद्धाश्रमात जाऊन जयच्या स्काऊटने केलेली नाताळची कार्ड देतो आणि नंतर नाताळची गाणी त्यांच्यासाठी गातो, त्यांच्या चेहेऱ्यावरचा आनंदा अमूल्य असतो. ह्या वर्षी तर गाणीं म्हणुन झाल्यावर मुलांना मस्त सजवलेले कप केक मिळाले, जे त्या सर्व वृद्ध लोकांनी मिळून बनवले होते.
इथे सगळ्या गोष्टी/कार्यक्रम चालतात ते 'voluenteering' (स्वयंसेवक) च्या बळावर. एक जण पुढाकार घेऊन कार्यक्रम बनवतो, वेगवेगळ्या कामांची यादी करतो आणि स्वयंसेवक एक एक काम करतात. Everything is self organized, no one bosses, just tries to do your best. जयच्या शाळेत 'Winter Workshop' हे त्याचा उत्तम उदाहरण आहे. इतक्या सुंदर मुलांसाठी activities and crafts की मुलं आनंद त्यांचे पालक एकदम खुश. ३ वर्षांपासून हा उपक्रम मस्त चालू आहे आणि दर वर्षी पुढच्या वर्षीच्या अजून अपेक्षा वाढवतो.
जयनी केलेलं सुंदर ऑर्नामेंट
जयच्या शाळेतली पार्टी मस्त झाली, जयने एक क्रिसमस ट्री चे ऑर्नामेंट बनवले.
आमच्या ऑफिस पार्टीला मी आपला मसाले भात करून नेला, सगळ्यांनी आवडीने खाल्ला. जोडीला ऑर्नामेंट/कुकी डेकोरेशन स्पर्धा पण होती, मला बक्षीस मिळाले.
![](https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiJol8NgenKhLmTboT-QvDOOj3vPoiUu0QfDt9QSdngw73-n8xuOqssHoWM3dYrr0bYcShYZ_sOXSaa1-8pNW7bzma7Cumokr8DXCJVnJOs3sRRtVvjdD2Rb2nwAuGQqhmzW_h3r4C1sQXP/s320/IMG_1516.jpg)
ह्या सीजन दरम्यान खूप ठिकाणी लाईट शोज असतात, घराला खूप लाइटिंग करतात. काही काही घरं अगदी ह्या साठी प्रसिद्ध असतात, जिथे लोक बघण्यासाठी खूप गर्दी करतात.
न्यू यॉर्क पण खूप मस्त सजवतात. ह्या वर्षी आम्ही नवीन म्हणजे चिनी लाईट फेस्टिवल बघितला, प्रचंड सुंदर होता. एवढ्या थंडीत पण (जवळपास -५ ते -११ तापमान) लोक पाहायला गर्दी करतात.
वर्षाचा शेवट आम्ही ३ फॅमिली ६ दिवसांसाठी एकत्र राहून केला, असं वाटलं आपण एकत्र कुटुंबात राहत आहोत. सगळ्यांनी एकमेकांची खूप काळजी घेतली आणि एकमेकांच्या सहवासाचा आनंद घेतला आणि 'Tis the season to be jolly' म्हण खरी केली.
आमच्या ह्या वर्षीच्या भेटीची आठवण(G-B-S)
कॅमेऱ्यात बंदिस्त केलेले काही क्षण https://photos.app.goo.gl/a2M3Q3zXgeiLj5Vf8
Comments
Post a Comment