थॅंक्सगिविंग पासुन ते नविन वर्ष सुरु होई पर्यंत खुप सारे वेगवेगळे सण आणि पार्टीज सुरु असतात त्याला 'Holiday Seaon' असं म्हणतात. सगळे आपली कामं संपवुन 'सेलिब्रेशन' मूड मधे असतात, basically रिलॅक्स अँड बी जॉली! थॅंक्सगिविंग सुट्टीच्या दरम्यान बहुतांशी लोकं क्रिसमस ट्री लावून सजवतात. बरेच लोकं खरा क्रिसमस ट्री तोडून आणतात. आमच्या घरा शेजारी मोठा क्रिसमस ट्री फार्म आहे, अगदी बघण्यासारखा. तिथे ४० फूट उंचीचा सांता लावलाय आणि खरे रेनडीर आणतात, गरम गरम कूकीज, पोपकोर्न विकायला असतात. तिथे गेले कि मस्त festive वाटत. इथल्या कुटुंबांकरता क्रिसमस ट्री आणणे हा एक सोहळा आहे. जे खोटा ट्री लावतात त्याच्यासाठी पण सोहळाच असतो, जसं बसेमेन्ट मधून ट्री, ऑर्नामेंट्स, डेकोरेशन्स आणणे, लावणे आणि प्रत्येक ऑर्नामेंट सोबतच्या आठवणी. आमचे शेजारी त्यांच्या बागेतलाच क्रिसमस ट्री तोडतात, त्यांचा ट्री जवळपास १८ फुटाचा असतो. ह्या वर्षी मी माझ्या ऑफिस डेस्क वर पण क्रिसमस ट्री लावला. ह्या दरम्यान येथील खुप लोकं समाजाला देतात . दुसऱ्याकडे काय नाही ते द्यायचा प्रयन्त करतात. आमच्या ऑ...