३ वर्षांपूर्वी श्रीने शहतुताचं झाड मोठ्या हौसेनी लावलं. इंग्लिश नाव माहित नव्हतं पण शोधून काढून (मलबेरी असं नाव आहे ) ऑनलाईन ऑर्डेर केलं. आल्यावर कळलं की झाड किती लहान आहे. वाटलं किती वर्ष लागतील. २ दिवसांपूर्वी श्री म्हणे झाड तर छान वाढलय पण फळं कधी लागणार? दुसरं झाड घेवूत का, पॉलिनेशन साठी. असा विचारच करत असताना काल मी गवत कापताना, झाडाला फळं लागलेली दिसली. एक नाही, दोन नाही, असंख्य, इतकं भारी वाटलं की विचार केला श्री ला किती आनंद होईल म्हणून छोटी पिकनिक करूयात आणि सरप्राईज देऊयात. तर ही आमची छोटीशी पिकनिक आणि clebration with cranberry pie and mint tea (श्री चे दोन्ही आवडते प्रकार)